Sunday, April 02, 2023

महत्त्वाकांक्षा

                      भूतकाळातील गोष्टी मनात पकडून सामोरे जाण्यात अर्थ नाही, पण भूतकाळातून आपण काय शिकवण घेतली हे महत्त्वाचे ठरते. एखाद्या परीक्षेत मनापासून अभ्यास केला असता  तर आपण त्यात उत्तीर्ण झालो असतो अशी खंत मनात ठेवून आपला निकाल बदलत नाही पण पुढे असणाऱ्या परीक्षेची या क्षणापासून अभ्यासाला बसणे ही गोष्ट आपल्याला पूर्वी असणाऱ्या परीक्षेमधून शिकायला मिळाल. हे एक उदाहरण झाल पण जीवनात अनेक प्रसंग येतात, कधी अपयश येते क मनासारख होत नाही किवा अचानकपणे काही प्रसंग अनुभवतो, या सर्वांना हिमतीने, बुद्धीने हाताळता यायला हवं. एखाद्या गोष्टीची बोंब करत बसण्यापेक्षा योग्य ते कर्म करून यश संपादन करण्याची महत्त्वाकांक्षा असणे गरजेचे आहे.


#BeStrong #LiveInTheMoment 

Sunday, March 19, 2023

Live in the moment

प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे विचार आहेत आणि प्रत्येकाकडे विचाराची जागा आहे म्हणजेच एक विशिष्ट वेळेला मन विचारात जातं. तशी एक जागा म्हणजे प्रवास. प्रवास करताना विविध गोष्टी आपल्याला दिसतात. 
एक माझा अनुभव सांगू इच्छिते.

काल ऑफिस वरून परतीच्या प्रवासात वेगळाच आनंद होता. ढगाळ वातावरण, लखलखीत प्रकाश करण्याऱ्या वीजा, रिमझिम पाऊस आणि प्रसन्न वातावरणात भर घालणारा मातीचा सुगंध. दिवसभराचा ताणतणाव, थकवा अगदी क्षणात दूर होऊन मन सुद्धा प्रसन्न झालं.

तारे आपल्याला आकाशात दिसतात, काळोख आकाशात स्वयंप्रकाशित अश्या चांदण्या आपल्याला जमिनीवर सुद्धा पाहायला मिळतात ते म्हणजे लाइट्स. खिडकीवाटे उंचीवरून पाहल्यास जमिनीवर चकाकी पाहायला मिळते ते एक तर स्ट्रीट लाइट्स असतात किंवा गाडीचे लाइट्स इ. परंतु असा नजारा दृष्टीस आल्यास मन तृप्त होते. 

आणि यात  G20 SUMMIT ची तयारी, अगदी सर्व भिंती, उड्डाणपूल अगदी रंगबिरंगी चित्रांनी सजलेले, वेगळ्या वेगळ्या विषयावरचं आकर्षक रांगोटी काम, मध्यक-ला विविध प्रकारचे वनस्पती लावलेले, नवीन रोषणाई, डिजिटल जाहिराती, आपली संस्कृती दाखवणारे पुतळे.

मन बेभान करणारी भजन, गाणी ऐकत जीवनाचे विचार करीत करीत प्रवास कधी संपला ते पण कळलं नाही. 


#Live in the moment


15/03/2023

Sunday, March 12, 2023

प्रेम असं ही

सकाळी असाच मनात विचार आला, जेव्हा एखाद्या व्यक्तीला हसताना बघतो तेव्हा आपल्या गालावर हसू येत, ती व्यक्ती आपल्यासाठी प्रेरणा असते किंवा आपल्याला त्या व्यक्तीबद्दल आदर असतो. हाच विचार करता करता मला माझ्या डोळ्यासमोर आले ते म्हणजे रतन टाटा सर. आलं ना तुम्हाला पण गालावर हसू, सरांच व्यक्तिमत्त्व च इतका रुबाबदार आहे की फक्त भारतातील नाही तर पूर्ण जगातील व्यक्ती त्यांना खूप मानतात.आपण ना त्यांना कधी भेटलो ना त्यांच्याशी संवाद केला तरी त्याच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या प्रेमात पडलो. हे असे सुध्दा प्रेम असते. 

म्हणूनच प्रेमाला समजायला एक व्याख्या तयार होऊ शकत नाही. ते अनेक प्रकारे विविध रूपाने आपल्यापुढे येत असते. अश्या थोर व्यक्तिमत्त्व आपल्यासाठी एक आदर्श व्यक्ती असतात. त्यांच्याकडून प्रेरणा मिळून आपल आयुष्य मार्गी लागण्यास मदत मिळते. 



चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...