Sunday, March 12, 2023

प्रेम असं ही

सकाळी असाच मनात विचार आला, जेव्हा एखाद्या व्यक्तीला हसताना बघतो तेव्हा आपल्या गालावर हसू येत, ती व्यक्ती आपल्यासाठी प्रेरणा असते किंवा आपल्याला त्या व्यक्तीबद्दल आदर असतो. हाच विचार करता करता मला माझ्या डोळ्यासमोर आले ते म्हणजे रतन टाटा सर. आलं ना तुम्हाला पण गालावर हसू, सरांच व्यक्तिमत्त्व च इतका रुबाबदार आहे की फक्त भारतातील नाही तर पूर्ण जगातील व्यक्ती त्यांना खूप मानतात.आपण ना त्यांना कधी भेटलो ना त्यांच्याशी संवाद केला तरी त्याच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या प्रेमात पडलो. हे असे सुध्दा प्रेम असते. 

म्हणूनच प्रेमाला समजायला एक व्याख्या तयार होऊ शकत नाही. ते अनेक प्रकारे विविध रूपाने आपल्यापुढे येत असते. अश्या थोर व्यक्तिमत्त्व आपल्यासाठी एक आदर्श व्यक्ती असतात. त्यांच्याकडून प्रेरणा मिळून आपल आयुष्य मार्गी लागण्यास मदत मिळते. 



Wednesday, March 08, 2023

आत्मनिर्भर स्त्री

ती आहे म्हणून 
आपण आहो 
ती आहे म्हणून 
घरपण आहे 
ती आहे म्हणून 
विश्व आहे 
ती आहे म्हणून 
नात्यांमध्ये प्रेम  आहे 


                       ८ मार्च म्हणजे  जागतिक महिला दिन, हा दिवस फक्त आपल्या महाराष्ट्रापर्यंत किंवा  देशांपर्यंतच नाही तर संपूर्ण जगाचा महिला दिन आहे. ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी कामाचे तास कमी करणे व सुरक्षितता इत्यादि मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलने केली होती आणि हे आंदोलन म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी  केलेला  पहिला लढा होता, आणि या लढ्याची पूर्ण मेहनत आज संपूर्ण जगाला  दिसते आहे. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे, तरी सुद्धा तिला प्रत्येक संकटावर मात करावी लागते, तिला सामोरे जावे लागते, अस म्हणतात स्त्रीने आत्मनिर्भर बनले पाहिजे, नक्कीच याच कारण एकच आहे, पुढची पिढी कशी घडवायची, कसे संस्कार हवे, कश्या चालीरीती हव्या हे सर्व एक स्त्रीवर अवलंबून असते. ती आहे त्यामुळे आज मी लिहीत आहे. ती आहे म्हणून तुम्ही वाचत आहात, बघत आहात. स्त्री सन्मानाची सुरुवात आपण आपल्या घरापासून करायला हवी, म्हणायला बोलायला खूप छोटा शब्द आहे स्त्री, महिला, WOMEN पण याच शब्दात कितीतरी ताकद आहे, बळ आहे कारण हीच स्त्री आपल्या मुलांमुलीवर चांगले संस्कार व्हावे म्हणून आपल्या जीवाचे रान करते, याचे उदाहरण कितीतरी आपण  देऊ शकतो.


ज्याला स्त्री ही बहीण म्हणून कळली 
तो मुक्ताबाईचा ज्ञानदेव झाला 
ज्याला स्त्री ही आई म्हणून कळली 
तो जिजाऊचा  शिवबा झाला 
ज्याला स्त्री ही पत्नी म्हणून कळली 
तो रमाचा भीम  झाला आणि सीतेचा राम झाला 
ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली  
तो राधेचा श्याम झाला 


                                हे आहे स्त्रीचे महत्त्व आणि संस्कार.  प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा मोठा वाटा आहे हे सर्व म्हणतात . जागतिक महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करणे, एक जागरूकता आणणे हेच आहे. आता काही लोकांना वाटते की माणसांच्या समोर स्त्रीने जायला नको, पुरुषयांप्रमाणे सर्वच क्षेत्रात काम करण्याची गरज काय आहे या शंका सुद्धा अजूनही समाजात जीवंत आहेत. 

                             स्त्रीचे कार्य क्षेत्र फक्त चूल आणि मूल इतकंच मर्यादित राहिले नाही. प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, आताच स्त्री समोर गेली नाही तर हे आधीच्या पिढी न पिढी  स्त्री प्रगती करते आहे आणि सुरुवात करते म्हटल तर या स्वराज्य निर्मितीसाठी शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ,  समाजात समाजकार्य करण्याऱ्या अहिल्याबाई होळकर,  शिक्षणाची दार उघडी करणाऱ्या क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले , भारताच्या पहिल्या महिल्या राष्ट्रपति प्रतिभाताई पाटील,  वर्तमानात  राष्ट्रपतीचा कारभार पाहणाऱ्या  म्हणजे द्रौपदी मुर्मू आहे. पहिल्या महिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या आणि अनाथांची माय  सिंधुताई सपकाळ होत्या. 

                             अनेक महिलांनी  यशस्वी कामगिरी करून जगात ओळख निर्माण केलीच पण येणाऱ्या पिढीला नवीन ऊर्जा, प्रोत्साहन देण्यात तितकाच वाटा आहे.  हीच आहे नारी शक्ती. आज स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत आपली  ओळख निर्माण करत आहे. म्हणून मी म्हणते नारी हीच शोभा आहे घरची. 



एक यावा असा दिन ना राहो महिला 'दीन' रोज असावा महिला  दिन 

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 





Thursday, March 02, 2023

मनातलं काही

                      तुम्हाला माहीत आहे का आपल्या देशाची एक अनोखी ओळख आहे, आपला  देश म्हणजे भारत, पूर्ण परिसर दणाणून टाकणारं  घोषवाक्य भारत माता की जय असे आपण म्हणतो. लहानपणापासूनच प्रत्येकाला शिकविले जाते की भारत हा फक्त देश नसून आपली माता सुद्धा आहे,  आणि आपला महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र किवा साम्राज्य. 

                      आपला देश /राज्य घडवण्यासाठी अनेक थोरपुरुषांना वीरमरण आले, अनेक क्रांतिकारी सैनिकांना फाशीची शिक्षा देण्यात आली, स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपलं जीवनदान दिल. आपला इतिहास खूप मोठा आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा  विचार न करता समाजाचा विचार केला, देशाला गुलामगिरीतून मुक्त कसे करावे याचा विचार करून अमलात पण आणला. पण दुःख या गोष्टीच वाटते आज समाजातील काही पापी लोकांना या गोष्टीची अजिबात जाणीव नाही. या जमिनीवर अनेक सजीव आहेत पण त्यातला मानवी रूपात जन्माला येण नशीब असते. पण हे सुद्धा लोकाना कळत नाही आहे.  प्रत्येकाचा जन्म हा एक स्त्रीच्या उदरातून होतो आणि त्याच स्त्रीला वाईट बोलणे, वाईट नजर टाकणे हे सर्व आपल्या महाराष्ट्रात घडते आहे, या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीत घडते आहे, नेहमी स्त्रीला मातेसमान मानणारे आपल्या महाराजांच्या स्वराज्यात अस घडताना चीड येते आणि वाईट सुद्धा वाटते. 

                       आपण आपल काम करायच, उगाच गोष्टीत आपला वेळ घालवायचा नाही अशी पण मानसिकता असणारे लोक असतात. आपल्यावर असते आपल्याला कोणत्या मार्गाने जायच. परंतु वाईट गोष्टीला विरोध करणे हे ही महत्त्वाचे, काही गोष्टी फक्त दुर्लक्षित करून जमत नाही त्यावर उपाय पण शोधणे महत्त्वाचे आहे. चांगल्या  गोष्टीची सवय लावायला वेळ लागतो, तसेच चांगल्या गोष्टीपेक्षा माणूस वाईट गोष्टीना लवकर आहारी जातो. 

                     एकीकडे कष्ट करून यशस्वी होणारी  व्यक्ति आणि एक वाईट गोष्टीत चर्चेत असणारी  व्यक्ति, यापैकी जास्त आकर्षण  वाईट गोष्टीला मिळते हे तितकच सत्य आहे. भान राखा आपण काय करतोय आणि वाईट गोष्टीला समर्थन चुकूनही करू नका.

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...