Monday, August 29, 2022

दृष्टिकोन

                      जस जस आपण या जगात मोठ होतो तस अनेक गोष्टीची जाणीव होत असते जगात काय बरोबर चालू आहे काय चुकीच आहे कोणत्या गोष्टीला विरोध असावा आणि कोणत्या गोष्टीला पुढाकार करावा. जस नाण्याला २ बाजू आहेत तस प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचे क्षण आणि दुःखाचे क्षण हे कायम जीवनभर  असणारच पण  त्याला सामोरे कसे जायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. आज काही गोष्टीला जेव्हा मनाला स्पर्श करतात तेव्हा त्या मनाला लागतात आणि डोळे पाणवतात ते मग आनंदाचे असो किवा दुःखाचे.... 


काही गोष्टीला धरून या जगात जगाव लागत प्रत्येक दिवस नवीन अपेक्षा नवीन संकट घेऊन  येतो परंतु आपले विचार मनात पक्के ठेवून प्रत्येक दिवस जगणे महत्त्वाचे असते. 
जीवन जगताना आपली नजर महत्त्वाची आहे पाहण्याचा दृष्टिकोन जीवन बदलण्यास मदत करते.

Sunday, August 14, 2022

हर घर तिरंगा



                                      भारतात  स्वातंत्र्याचे 75 वर्षे अगदी उत्साहाने आनंदाने साजरा केला जात आहे. नवीन नवीन उपक्रम राबवले जात आहेत. आपल्या देशाची शान आपला ध्वज हा शाळा कार्यालय, इतक्यात मर्यादित न राहत आज भारतातील  प्रत्येक घराघरात पोहचला आहे. त्या ध्वजाकडे बघून पूर्ण भारताच्या स्वातंत्र्यासाठी  लढा देणारे सर्व वीरांच्या महनतीचे फळ दिसते. पिंगाली वेंकय्या यांनी तिरंग्याची रचना केली. केशरी , पांढरा, हिरवा आणि निळे अशोक चक्र असा आपला ध्वज प्रत्येक भारतीयांच्या मनात रुजलेला आहे. प्रत्येक नागरिकांच देशप्रेम हे अफाट आहे. भारत हा विभिन्न संस्कृतीचा देश आहे. विविध धर्म, प्रथा रूढीने हा देश जोडला गेला आहे. नैसर्गिक प्रकृतीने नटलेला भारत हा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सुद्धा प्रगतिशील आहे. 


स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

जय हिंद जय भारत 




हर घर तिरंगा 

Wednesday, July 13, 2022

आनंदाचे क्षण

                                           आनंद या शब्दाच वर्णन करायच म्हटल तर प्रत्येक व्यक्तीच्या मनातील बोलके शब्द निराळे असतील. प्रत्येक व्यक्तीची वेगळी भावना असते. पाऊस आला की मोर आपला पिसारा सृष्टीमध्ये पसरवत आनंद व्यक्त करतो. वाऱ्याची झुळूक आली की छोटस रोपट वाऱ्याच्या तालात डोलते. पेरलेल्या धान्याला पावसाच्या पाण्याने कोंब येतात आणि वाढ होते. प्राण्याना आनंद झाला की ते पण शेपूट हलवून किवा प्रेम दाखवून त्यांच्या मनातली गोष्ट बोलून दाखवतात. आणि माणसाला आनंद होतो तेव्हा सर्वात जवळच्या व्यक्तीला सांगतो. नाचतो, गातो.
अस प्रत्येक जिवाची रीत वेगळी असली तरी आनंदाचे क्षण सर्वांसाठी सारखेच असतात.

चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...