गजानना श्री गणरायाआधी वंदू तुज मोरया
प्रत्येक लहान मोठ्या भक्ताला गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली असते. मागच्या वर्षी सारखाच यावर्षी सुद्धा १० दिवस वेगळाच उत्साह असतो. पूजेत सर्वप्रथम श्री गणेश पूजन केले जाते. गणपतीला अनेक नावे आहेत. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या शब्दांच्या गजरात, बाप्पाच स्वागत केले जाते. मनासारखी सजावट व्हावी म्हणून सर्व सज्ज असतात. मित्र मंडळा तर्फे स्थापना करण्यात आलेल्या गणपती बाप्पाचे रूप खूपच मनमोहक असते. ढोल ताशे यांच्या आवाजाने परिसर दुमदुमायला लागतो. बाप्पांना आवडणारे मोदक घरोघरी बनवले जातात. वातावरणात एक वेगळंच चैतन्य निर्माण होते. आपली संस्कृतीच जतन आपणच करायला हवं.
No comments:
Post a Comment