जस जस आपण या जगात मोठ होतो तस अनेक गोष्टीची जाणीव होत असते जगात काय बरोबर चालू आहे काय चुकीच आहे कोणत्या गोष्टीला विरोध असावा आणि कोणत्या गोष्टीला पुढाकार करावा. जस नाण्याला २ बाजू आहेत तस प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचे क्षण आणि दुःखाचे क्षण हे कायम जीवनभर असणारच पण त्याला सामोरे कसे जायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. आज काही गोष्टीला जेव्हा मनाला स्पर्श करतात तेव्हा त्या मनाला लागतात आणि डोळे पाणवतात ते मग आनंदाचे असो किवा दुःखाचे....
लिखाण हे एक संवादाचे साधन आहे. प्रत्येकाला आपलं जीवन कस जगायचं याच स्वातंत्र्य आहे. आपला देश जसा आधुनिक प्रगती करत आहे तसंच मानवाचे विचार पण आधुनिक गोष्टीकडे वळत आहे, या जगासोबत चालता चालता मूळ तत्त्वांचा ऱ्हास होत आहे. आजच्या काळाची गरज बघून मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे. एकापण व्यक्तीला या तत्त्वाचे महत्त्व पटले तरी मला आनंद आहे.
Monday, August 29, 2022
दृष्टिकोन
काही गोष्टीला धरून या जगात जगाव लागत प्रत्येक दिवस नवीन अपेक्षा नवीन संकट घेऊन येतो परंतु आपले विचार मनात पक्के ठेवून प्रत्येक दिवस जगणे महत्त्वाचे असते.
जीवन जगताना आपली नजर महत्त्वाची आहे पाहण्याचा दृष्टिकोन जीवन बदलण्यास मदत करते.
Sunday, August 14, 2022
हर घर तिरंगा
भारतात स्वातंत्र्याचे 75 वर्षे अगदी उत्साहाने आनंदाने साजरा केला जात आहे. नवीन नवीन उपक्रम राबवले जात आहेत. आपल्या देशाची शान आपला ध्वज हा शाळा कार्यालय, इतक्यात मर्यादित न राहत आज भारतातील प्रत्येक घराघरात पोहचला आहे. त्या ध्वजाकडे बघून पूर्ण भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणारे सर्व वीरांच्या महनतीचे फळ दिसते. पिंगाली वेंकय्या यांनी तिरंग्याची रचना केली. केशरी , पांढरा, हिरवा आणि निळे अशोक चक्र असा आपला ध्वज प्रत्येक भारतीयांच्या मनात रुजलेला आहे. प्रत्येक नागरिकांच देशप्रेम हे अफाट आहे. भारत हा विभिन्न संस्कृतीचा देश आहे. विविध धर्म, प्रथा रूढीने हा देश जोडला गेला आहे. नैसर्गिक प्रकृतीने नटलेला भारत हा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सुद्धा प्रगतिशील आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय हिंद जय भारत
हर घर तिरंगा
Subscribe to:
Comments (Atom)
चांदणी
निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...
-
काल ९ ऑक्टोबर रोजी श्री रतन नवल टाटा सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बातमी साधारण मध्यरात्री प्रसारित माध्यमातुन कळाली. जणूकाह...
-
आनंदाने जीवन जगण्याची इच्छा बाळगत आईबाबांनी एका मुलीला जन्म दिला. फक्त आईबाबाच नाही तर पूर्ण परिवार आनंदाने न्हाहून निघाले....
