कधी कधी मनमोकळेपणाने रडावे
मनातल्या वेदना अश्रू वाटे बाहेर पडावे
रडणं ही कमकुवत मनाची निशाणी नसून
भावनांना फुटलेला पाझर असावा
नदीचं पाणी संथगतीने वाहते तसच
डोळ्यातलं पाणी हे टपोऱ्या पावसाचे थेंब जणू
मनाला दिलासा मिळाला तरीही
पाणावलेले डोळे खुप काही सांगतात