| होळी |
लिखाण हे एक संवादाचे साधन आहे. प्रत्येकाला आपलं जीवन कस जगायचं याच स्वातंत्र्य आहे. आपला देश जसा आधुनिक प्रगती करत आहे तसंच मानवाचे विचार पण आधुनिक गोष्टीकडे वळत आहे, या जगासोबत चालता चालता मूळ तत्त्वांचा ऱ्हास होत आहे. आजच्या काळाची गरज बघून मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे. एकापण व्यक्तीला या तत्त्वाचे महत्त्व पटले तरी मला आनंद आहे.
Sunday, December 01, 2024
Sunday, November 24, 2024
वय आणि समजूतदारपणा
समाजाचा परिणाम हा व्यक्तिमत्व विकासावर होतो. लहानपणापासून वयात येत पर्यंत सभोवताल घडणाऱ्या घटनांचा परिणाम हा त्या व्यक्तीच्या विकासावर परिणाम करत असतो. प्रत्येक गोष्ट समजण्यासाठी ती वेळ यावी लागते.
कानांनी एकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की स्वतः बघितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा हा प्रश्न नवा नव्हेच. प्रत्येक गोष्ट आपल्याला त्याच वयात कळेल अस होत नाही. वयात आल्यावर ती गोष्ट आपोआप आत्मसात केल्या जाते, त्यासाठी सल्ल्याची गरज भासत नसते. जेव्हा व्यक्तीला परिपक्वता येते तेव्हा समज येते, काही गोष्टीबद्दलचा समज हा बदलू शकतो. आपण भूतकाळात विचार केला तो चुकीचा होता हे सुद्धा प्राप्त होऊ शकते.
आजच्या काळात विचारांने समृद्ध असणे फार गरजेचे आहे. योग्य समज येणे ही काळाची गरज आहे. भूतकाळात आपले काही विचार असतील पण त्याच मुद्द्यांवर आता वर्तमानकाळात वेगळे विचार असू शकतात. काळानुसार बदल हा निसर्गाचा नियमच आहे.
Sunday, November 17, 2024
असच काही
नात्यामधले वाद हे अमावस्याच्या रात्री सारखे असतात. अमावस्येला सगळीकडे काळोख अंधार असतो. रोज आसमंत प्रकाशित करणारा चंद्र दिसत नसतो. अमावस्या संपली की हळू हळू चंद्राचं नवीन रूप पाहायला मिळते. दररोज चंद्र कलेनी वाढत जातो आणि मन ओढून घेणारी पौर्णिमेची रात्र येते. पौर्णिमेचा चंद्र बघून मनाला शांत वाटते. कवीच्या मनात घर करतो.
अश्याचप्रकारे मैत्रीमध्ये वाद झाले की मन उदास होते पण प्रेमापोटी वाद विसरून एकत्र येणे हे पौर्णिमेच्या रात्री सारखे असते. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे नात्यामध्ये एक वेगळं तेज निर्माण होते आणि रागावणाऱ्या चेहऱ्यावर आनंदाचे बोल असतात अशीच ही वळण त्या मैत्रीला पुन्हा घट्ट करून जातात.
Subscribe to:
Comments (Atom)
चांदणी
निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...
-
काल ९ ऑक्टोबर रोजी श्री रतन नवल टाटा सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बातमी साधारण मध्यरात्री प्रसारित माध्यमातुन कळाली. जणूकाह...
-
आनंदाने जीवन जगण्याची इच्छा बाळगत आईबाबांनी एका मुलीला जन्म दिला. फक्त आईबाबाच नाही तर पूर्ण परिवार आनंदाने न्हाहून निघाले....