तुम्हाला माहीत आहे का आपल्या देशाची एक अनोखी ओळख आहे, आपला देश म्हणजे भारत, पूर्ण परिसर दणाणून टाकणारं घोषवाक्य भारत माता की जय असे आपण म्हणतो. लहानपणापासूनच प्रत्येकाला शिकविले जाते की भारत हा फक्त देश नसून आपली माता सुद्धा आहे, आणि आपला महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र किवा साम्राज्य.
आपला देश /राज्य घडवण्यासाठी अनेक थोरपुरुषांना वीरमरण आले, अनेक क्रांतिकारी सैनिकांना फाशीची शिक्षा देण्यात आली, स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपलं जीवनदान दिल. आपला इतिहास खूप मोठा आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार केला, देशाला गुलामगिरीतून मुक्त कसे करावे याचा विचार करून अमलात पण आणला. पण दुःख या गोष्टीच वाटते आज समाजातील काही पापी लोकांना या गोष्टीची अजिबात जाणीव नाही. या जमिनीवर अनेक सजीव आहेत पण त्यातला मानवी रूपात जन्माला येण नशीब असते. पण हे सुद्धा लोकाना कळत नाही आहे. प्रत्येकाचा जन्म हा एक स्त्रीच्या उदरातून होतो आणि त्याच स्त्रीला वाईट बोलणे, वाईट नजर टाकणे हे सर्व आपल्या महाराष्ट्रात घडते आहे, या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीत घडते आहे, नेहमी स्त्रीला मातेसमान मानणारे आपल्या महाराजांच्या स्वराज्यात अस घडताना चीड येते आणि वाईट सुद्धा वाटते.
आपण आपल काम करायच, उगाच गोष्टीत आपला वेळ घालवायचा नाही अशी पण मानसिकता असणारे लोक असतात. आपल्यावर असते आपल्याला कोणत्या मार्गाने जायच. परंतु वाईट गोष्टीला विरोध करणे हे ही महत्त्वाचे, काही गोष्टी फक्त दुर्लक्षित करून जमत नाही त्यावर उपाय पण शोधणे महत्त्वाचे आहे. चांगल्या गोष्टीची सवय लावायला वेळ लागतो, तसेच चांगल्या गोष्टीपेक्षा माणूस वाईट गोष्टीना लवकर आहारी जातो.
एकीकडे कष्ट करून यशस्वी होणारी व्यक्ति आणि एक वाईट गोष्टीत चर्चेत असणारी व्यक्ति, यापैकी जास्त आकर्षण वाईट गोष्टीला मिळते हे तितकच सत्य आहे. भान राखा आपण काय करतोय आणि वाईट गोष्टीला समर्थन चुकूनही करू नका.








