लिखाण हे एक संवादाचे साधन आहे. प्रत्येकाला आपलं जीवन कस जगायचं याच स्वातंत्र्य आहे. आपला देश जसा आधुनिक प्रगती करत आहे तसंच मानवाचे विचार पण आधुनिक गोष्टीकडे वळत आहे, या जगासोबत चालता चालता मूळ तत्त्वांचा ऱ्हास होत आहे. आजच्या काळाची गरज बघून मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे. एकापण व्यक्तीला या तत्त्वाचे महत्त्व पटले तरी मला आनंद आहे.
Sunday, February 25, 2024
Friday, February 16, 2024
अन्न हे पूर्णब्रह्म
आपल्या जीवनातल्या अतिआवश्यक गरजापैकी एक म्हणजे अन्न. कुणी जगण्यासाठी खातात तर कुणी खाण्यासाठी जगतात. जशी अंगावरची जबाबदारी वाढते तसेच आपल्या आवडी निवडी बदलतात, न आवडणाऱ्या गोष्टीत पण मन रमायला लागतं. आईला नेहमी म्हणायची तू स्वयंपाक कर मी बाकी काम करते. स्वयंपाक करणे मला फारस आवडायचं नाही🙅. नेहमीच्या जेवणात असणारे पदार्थ बनवायला मी शिकले, पण एक जबाबदारी म्हणून करायचे, आई जसे जसे सांगेल तसे करायची😊.
कामावर लागल्यापासून स्वतःलाच सर्व करावं लागतं. एक चविष्ट😋 पदार्थ खाल्ल्याने सुद्धा मनाला तृप्ती☺️मिळते हे अनुभवले. जीवाला सुखाच पोटभर अन्न खाऊ घालणं म्हणजे पुण्यचं हे समजले. सांबार 🌱आणि कढीपत्ता🌿 च महत्त्व अन्यसाधारण वाटू लागले. सर्व जिन्नस मिळून किती चविष्ट पदार्थ होतो हे कळले.
नेहमीच्या स्वयंपाक व्यतिरिक्त वेज बिर्याणी, समोसे, केक🎂, मुंचुरियन, इडली, डोसे, ढोकळा, श्रीखंड, शिरा, लाडू, भजे, बाफले, पावभाजी, साबुदाणा वडा, सांबार वडा, गुलाब जामुन, रसगुल्ला, तांदळाची खीर, बासुंदी, साबुदाणा खीर, मोदक, चिवडा, ज्वारीच्या पीठाचे आंबील, इ. पदार्थ बनविण्यात तरबेज झाली.
नवीन पाककृती बघणे आणि करून बघण्याची आवडच निर्माण झाली. आणि नेहमी ती चविष्ट होईलच असं नाही मी बनवलेलं काही पदार्थ फसले सुद्धा आहे 🥲😅.
तव्यावर पोळी टाकताना हाताला लागणारे चटके, मिरचीची फोडणी देताना टूनुक चेहऱ्यावर उडणारा मिरचीचा दाणा💥, पावशीने भाजी कापताना बोटाला पडलेले चिरे किंवा टम्म फुगणाऱ्या पोळीतून निघालेल्या वाफेने हाताला झालेली आग या सर्व स्वयंपाक कला शिकत असताना झालेल्या आठवणीतील जखमा. जखम झाली म्हणून स्वयंपाक बनवणे थांबले नाही 🫶.
एकच सांगायचं स्वयंपाक करणे ही एक कलाच आहे. काहींना सारखच साहित्य दिले आणि एकच पदार्थ बनवायला सांगितला तरीही चव ही निराळीच असेल. स्वयंपाकात पण जादू🪄 असू शकते याचा विचार पण केला नव्हता. शिकत राहायचं, प्रयत्न करत राहायचं, न जमणाऱ्या गोष्टी सुद्धा जमायला लागतात 🤩.
Subscribe to:
Comments (Atom)
चांदणी
निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...
-
काल ९ ऑक्टोबर रोजी श्री रतन नवल टाटा सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बातमी साधारण मध्यरात्री प्रसारित माध्यमातुन कळाली. जणूकाह...
-
आनंदाने जीवन जगण्याची इच्छा बाळगत आईबाबांनी एका मुलीला जन्म दिला. फक्त आईबाबाच नाही तर पूर्ण परिवार आनंदाने न्हाहून निघाले....