Saturday, September 23, 2023

एक वेगळा उपक्रम

                      रूमची स्वच्छता 🧹मोहीम राबवून एक मोकळा श्वास घेतला आणि समोरच्या टेबल वर ठेवलेल्या वर्तमानपत्रावर नजर गेली. इतकी नजर जाण्यासारख काय होत त्यात  तर चक्क गणपती बाप्पाचं चित्र होत. लगेच उठून कात्रीने त्या गणपतीच्या चित्राला पेपर पासून वेगळं केलं. इतकं गोड चित्र समोर जाऊन कचऱ्यात गेल असतं, या विचाराने मनात खंत वाटू लागली.

                     आपल्याकडे घरोघरी सकाळी वर्तमानपत्र 📰वाचण्याची सवय असते. ठळक बातम्या, चालू घडामोडी माहिती करण्याच उत्तम साधन म्हणजे वर्तमानपत्र. पण तेच वर्तमानपत्र वाचून झाल्यावर अनेक मार्गी लागतो किंवा ते रद्दीत विकले जातात. म्हणजेच शेवटी वर्तमानपत्राचा एक कचराच होणार असतो पण मग आपल्या देवी देवतांचे चित्र त्या वर्तमानपत्रात समाविष्ट करणे किती चुकीचे आहे. फक्त वर्तमानपत्र नाही तर दिनदर्शिका, लग्नाच्या पत्रिका, फटाके, बॅनर, कपड्यावर चित्र किंवा पिशवीवर देवी देवतांचे चित्र असणे फार चुकीचे आहे. आपल्या धर्मात देवी देवतांचे महत्त्व सर्वांना माहीत आहे. आपल्या धर्मात अनेक देवी देवता आहेत आणि जर प्रत्येक सणाला प्रत्येक देवीदेवता यांचे चित्र साध्या साध्या गोष्टीमद्धे समाविष्ट करण्यात येत असतील तर हा देवाचा अपमान आहे. 

                        प्रत्येक व्यक्तीने थोडा जीवनात वेगळा मार्ग निवडला तरी ते आनंदाचे असेल. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, वर्तमानपत्र वापरताना एकदा नक्की बघा की त्यात आपले देवी देवतांचे छायाचित्र तर नाही ना असेलतर लगेच तो भाग काढून वेगळा ठेवावा, लग्नाच्या पत्रिकेत आपण देवाचे नाव लिहितोच आणि देव सर्व भक्तांना समजतो आणि तो नेहमी आपल्याला आशिर्वाद देतच असतो त्यामुळे देवाच्या चित्र ऐवजी वेगळी डिझाईन प्रिंट करा कारण वर्षभर जमा होण्याऱ्या पत्रिका आपण रद्दीतच देत असतो म्हणजे हा एक देवाचा अपमान झाला. 

                      माझ्या मते देवाचे स्थान हे फक्त  मंदिर🛕 आणि आपलं हृदय💗 आहे. आता विचार कराल, मंदिराबाहेर दुकान असतात त्यात तर किती देवाच्या मूर्ती, फोटो असतात. ते तर असणारच ना, जर भक्ताला देवाला आपल्या घरच्या मंदिरात स्थापना करायची असेल तर ती मूर्ती विकत घ्यावी लागेल. व्यवसायधारकानी जर या गोष्टीला महत्त्व दिले आणि देवांचे छायाचित्र छापणे बंद केले तर हे अति उत्तम असेल. 

आज मी हा प्रसंग अनुभवला आणि माझी चूक मला कळाली. ही चूक तुमच्या हातून होवू नये यासाठी मी हा लेख  लिहिते 🖊आहे.  आयुष्यात लहान लहान बदल केले तरी जीवन जगण्याचा मार्ग बदलतो. 😊




गणपतीचे मनमोहक चित्र 

Tuesday, September 19, 2023

इच्छा तिथे मार्ग

                      काही गोष्टींचा विचार आपल्या मनात संचारत असतो आणि ती गोष्ट करायची आपली खूप मनापासून इच्छा असते परंतु काही कारणास्तव ती होणार नाही किवा वेळ नाही यामुळे आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही. माझ्यासोबत होत अस कधी कधी. पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग तसच काही झाल आणि देवाच्या इच्छेने माझी इच्छा पूर्ण झालीच, देवाने कार्य माझ्या हातून केले असले तरीही करविता देवच आहे. 

                      वर्षातून एकदा देव बाप्पा म्हणजेच आपले गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होतात, सर्व भक्त उत्साहाने गणपती बाप्पाचे आगमन करतात. गणपती उत्सव जवळ येताच मला पण विचार आला की आपण पण देव बाप्पाच्या स्वतःच्या हाताने घडवलेल्या मूर्तीचे  पूजन करावे. पण आगमनाच्या काही दिवस आधी मला मूर्ती बनवणे शक्य झाले नाही. मनात इच्छा तर होतीच पण आता वेळेवर कस काय होणार म्हणून  आपण नेहमीसारखी पूजा करावी पण देवाला वाटले असेल हिला प्रोत्साहन द्याव म्हणजे बरोबर ही करेल आणि तसच झाल मला ते  मिळाल आणि लगेच मूर्ती बनवायला लागली. एकीकडे बाप्पाचे भजन कानी येत होते आणि एकीकडे हाताने मूर्तीला आकार द्याला सुरुवात केली. संध्याकाळचे २ तास कसे निघून गेले कळले नाही. इतक्या कमीवेळेत मूर्ती तयार करणे सोपे नव्हते परंतु मनात इच्छा होती श्री गणेश चतुर्थी ला स्वतः ने बनवलेल्या मूर्तीची पूजा करायचीच आणि हे सर्व घडून फक्त देवाच्या आशीर्वादाने😊. 


तू सुखकर्ता तू  दुःखहर्ता 

तूच कर्ता आणि करविता 

मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया  


सर्वाना  श्री गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा 😊


#गणेशोत्सव २०२३



चांदणी

निरभ्र आकाशी प्रकाशाची चाहूल लागली  माझे पाऊल हे गच्चीकडे धावू लागली लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी वेधून घेतले माझे मन तारे बघण्यात माझे कमल नयन ...